Last Updated: 06/11/2023By Categories:

कलाशिक्षक लिलाधर पाचपोळे यांच्या ‘ निसर्ग संवाद ‘ या चित्रप्रदर्शनास प्रारंभ

आज दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय आणि बाळासाहेब पवार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा परिषद प्रश्नाला हतनूर येथील कलाशिक्षक लिलाधर पाचपोळे यांच्या ‘ निसर्ग संवाद ‘ या चित्रप्रदर्शनाचे आज छत्रपती संभाजीनगर येथील बालसाहित्यिक आणि सेवा निवृत्त कलाशिक्षक व बाल साहित्यिक मा. श्री. विश्वनाथ ससे यांच्या शुभहस्ते थाटात करण्यात आले.

या कार्यक्रमास व्यासपीठावर कला शिक्षक ज्ञानेश्वर गायके, योगेश पवार, कमलाकर खरात, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय जाधव सर, कला शिक्षक सुभाष गोरे सर, श्री पुरुषोत्तम बागुल सर ,श्री संजय त्रिभुवन उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना निसर्ग संवाद चित्र प्रदर्शनाचे उद्घाटक श्री विश्वनाथ ससे म्हणाले की, ‘ काळा आणि पांढरा हा रंग नाही तर ते अंधार आणि प्रकाश यांचे प्रतीक आहे. त्यांनी बोलताना त्यांच्या जीवनातील कला शिक्षक म्हणून विद्यार्थांना शिकवताना आलेल्या अनुभवाच्या आठवणींना उजाळा दिला व काही त्यांच्या बाल साहित्यातील कविता विद्यार्थ्यांना गाऊन दाखवल्या. समारोप प्रसंगी कलाशिक्षक श्री लीलाधर पाचपोळे यांनी काढलेल्या निसर्ग चित्रांचे विशेष कौतुक केले आणि कन्नड वासियांना आव्हान केले की, या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. संजय जाधव सर यांनी उपस्थितांचे आभार मांडले. विद्यार्थ्यांनी चित्रप्रदर्शन पाहण्याचा आनंद घेतला! या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे शिक्षक श्री अजित खंबाट, श्री निलेश देशमुख , शिक्षिका श्रीमती संतोषी जंगले, श्रीमती शारदा देशमुख आणि कन्नड शहरातील चित्रप्रेमी उपस्थित होते.

Related projects