Last Updated: 06/11/2023By

शरीर, श्वास, मन, विचार यांचा विकास विद्यार्थी दशेत झाला तर आयुष्य आनंदी होते.
– श्री कचरू गरसोळे

मानवी जीवनाच्या सुरवातीच्या काळात जर अन्नमय, प्राणमय , मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष विकसित झाले तर मानवी जीवन समृध्द होते. असे प्रतिपादन पंचकोष विकास विषयाचे मार्गदर्शन व आकाशवाणी निवेदक श्री कचरू गरसोळे यांनी केले. सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड आणि बाळासाहेब पवार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेच्या पुष्प २७ निमित्त ते बोलत होते. बोलतांना ते म्हणाले की, पंचकोष विकासात्मक शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यानुसार शिक्षण देऊन, त्याचे महत्व ओळखून जर विद्यार्थ्यांना पालक आणि शिक्षक यांच्याकडून मार्गदर्शन केले गेले तर विद्यार्थ्यांचे जीवन समृध्द होईल.

पंचकोष विकासात्मक शिक्षण या विषयी बोलताना त्यांनी पाचही कोष विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवले. अन्नमय म्हणजे शरीराचा विकास, प्राणमय म्हणजे श्वासाचा विकास, मनोमय म्हणजे मन, भावनांचा विकास, विज्ञानमय म्हणजे बुध्दीमत्ता, सकारात्मक विचार आणि आपल्यात असलेल्या सुप्तगुणांचा विकास आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासीठावर सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे शिक्षक श्री. देशमुख सर आणि शिक्षिका श्रीमती बिऱ्हारे मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्री बाई फुले कन्या विद्यालयाचे कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय जाधव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाकळे यांनी केले.

Related projects