Last Updated: 06/11/2023By Categories:

संस्कृती मंत्रालय, भारत सरकार व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या संयुक्त विद्यमाने, केरळ राज्यातील ग्रंथालय व साक्षरता चळवळीचे जनक मा. श्री पी. एन. पणीकर यांच्या स्मृती व सन्मान पित्यर्थ राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना वाचन दिवस / वाचन आठवडा / वाचन महिना साजरा करण्यासाठी उद्युक्त करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
माहे जून २०१७ मध्ये राष्ट्रीय चळवळीचा एक भाग म्हणून मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते १९ जून ते १८ जुलै २०२३ हा कालावधी २२ वा वाचन दिवस / वाचन महिना म्हणून साजरा करण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. याचे औचित्य साधून सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड यांच्या वतीने या वाचन सप्ताह निमित्त शालेय विद्यार्थ्यासाठी ग्रंथालय सहल आणि एक तास ग्रंथ वाचन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात कन्नड शहरातील १२ शाळांमधील प्रत्येकी ५० विद्यार्थी शाळेच्या वेळेत ग्रंथालयास भेट देऊन ग्रंथालयाची कार्यपद्धती समजून घेतील आणि एक तास आपापल्या आवडीचे कोणतेही एक पुस्तक वाचतील. या वाचन सप्ताहाची आज शुक्रवार दि. १४ जुलै २०२३ रोजी झाली. आज सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय आणि आनंदीबाई कोल्हे प्राथमिक शाळा या दोन शाळेतील विद्यार्थ्यांनी वाचनालयास भेट देऊन ग्रंथालय सहलीच्या निमित्ताने ग्रंथालयाची कार्यपद्धती समजून घेतली. यावेळी ग्रंथालय अधीक्षक नितीन वाकळे आणि ग्रंथपाल नरेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना एक तास पुस्तक वाचनासाठी बालसाहित्य विभागातील काही निवडक पुस्तके उपलब्ध करून दिली. या वेळी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे शिक्षक श्री. अजित खंबाट व आनंदीबाई कोल्हे प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. सुशील बोरसे व श्री. दीपक चौथमल हे उपस्थित होते. त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related projects