Last Updated: 07/11/2023By Categories:

आषाढी एकादशी निमित्त सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालयात ‘गजर विठ्ठलाचा’ भक्तिमय सोहळा.

कानडा राजा पंढरीचा, विठू माउली तू भक्तीगीतांच्या सुरात विठ्ठलभक्त तल्लीन. कन्नड येथे रविवारी सायंकाळी रंगली प्रसिध्द गायक राहुल खरे आणि सहकाऱ्यांची भजन संध्या सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड आणि बाळासाहेब पवार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त आयोजित विशेष कार्यक्रम वर्ष २ रे , रविवार, २ जुलै २०२३ सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते,

प्रसिद्ध गायक राहुल खरे ( गौरव महाराष्ट्राचा विजेता व इंडियन आयडॉल) त्यांना सह गायक ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज भवर ( प्रसिद्ध गायक व युवा कीर्तनकार) यांची साथ लाभली. या दोघांच्या सुमधुर गायनाला संगीताची साथ देण्यासाठी बासरी व हार्मोनियम वर साथ श्री. सतीश जोगदंड ( प्राध्यापक, MGM विद्यापीठ छ. संभाजी नगर )यांची होती. पखवाज वर प्रसिद्ध पखवाज वादक मृदुंग अलंकार ह.भ.प. संतोष महाराज सोळंके( प्राध्यापक, संत विद्यापीठ, पैठण) हे होते, तबल्यावर साथ तबला वादक श्री. सचिन राठोड यांची होती. साथ संगत ह.भ.प. विष्णू महाराज काळे. यांची होती. कार्यक्रमाचे आपल्या मधुर व माहितीपूर्ण आवाजात निवेदन डॉ. प्रा. कारभारी भानूसे यांनी केले.

या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी कन्नड शहरातील तसेच ग्रामीण भागातील विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related projects