Last Updated: 10/11/2023By Categories:

मराठवाड्याची अद्भुत भूमी विविधतेने नटलेली! – व्याख्याते, विश्वंभर पाठक.

मराठवाड्याची भूमी अद्भुत असून ती विविधतेने नटलेली आहे. मराठवाड्याची खाद्य संस्कृती, गड किल्ले, लेण्या, अभयारण्य, डोंगर दऱ्या, विविध बोलीभाषा, वेशभूषा यांनी समृद्ध आहे. असे प्रतिपादन – व्याख्याते, विश्वंभर पाठक यांनी सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय व बाळासाहेब पवार फाउंडेशन कन्नड आयोजित, शनिवार( ९ सप्टेंबर २०२३ )व्याख्यानमालेत, पुष्प ३६ मध्ये बोलतांना केले.

यावेळी व्यासपीठावर डॉ. रमेश सूर्यवंशी यांची अध्यक्ष म्हणून तर इंजी. कालिदास उपासनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्य ‘मराठवाडा : एक अद्भुत भूमी’ या विषयावर विशेष व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. बोलतांना पुढे ते म्हणाले की, मराठवाड्यातील जालन्याची मोसंबी, दौलताबादचे सीताफळ प्रसिद्ध आहे. खाद्य पदार्थामध्ये पण पिठल आणि भाकरी ही मराठवाड्याची देण आहे. औरंगाबाद आणि लातूर शहरे ही शिक्षणाची केंद्रे बनत आहे. लातूर पॅटर्न पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास हा अंगावर शहारे आणणारा व नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे, असे ते म्हणाले.अध्यक्षीय समारोपात डॉ. सूर्यवंशी यांनी मराठवाड्याचा महत्वाचा तालुका कन्नड मधील जैवविविधता, गडकोट, किल्ले, प्रसिद्ध ठिकाणे यावर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाकळे यांनी केले.

Related projects