Last Updated: 06/11/2023By Categories:

ग्रंथ हे अनेक संस्कृती, भाषा आणि समाज जाणून घेण्याचे प्रभावी माध्यम- डॉ. प्रा. रमेश सूर्यवंशी

पुस्तक म्हणजे अक्षरबद्ध केलेला समाज,संस्कृती आणि बोलीभाषा जाणून घेण्याचे प्रभावी मध्यम आहे. असे प्रतिपादन कन्नड येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ रमेश सूर्यवंशी यांनी आज सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड येथे जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभात केले.

या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन डॉ रमेश सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना डॉ सूर्यवंशी पुढे म्हणाले की, “जेव्हा आपण एखाद्या लेखकाचे पुस्तक वाचतो तेव्हा आपण त्या लेखकाने अनुभवलेले जीवन अभ्यासत असतो, त्यामुळे आपण जीवनभर जितकी जास्त पुस्तके आपण वाचतो, तितक्या जीवनाचे अनुभव आपल्याला बसल्याजागी घेता येतात, ”
यावेळी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जाधव प्रा.महेन्द्र बाविस्कर सर,अजित खंबाट सर, विनायकराव पाटील महाविद्यालयाचे प्रा. महेंद्रसिंह राजपूत आणि वाचनालय तथा अभ्यासिका अधीक्षक नितीन वाकळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

हे ग्रंथ प्रदर्शन २३ आणि २४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजे पर्यंत सर्वासाठी खुले होते . कन्नड तालुक्यातील नागरिकांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला.

Related projects