Last Updated: 06/11/2023By Categories:

आज दि.8 एप्रिल 2023 रोजी सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय आणि बाळासाहेब पवार फाऊंडेशन कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे चौदावे व्याख्यान पुष्प गुंफण्यात आले. आजच्या व्याख्यानमालेत जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून माधवबाग यांच्या सहकार्याने ‘ उच्च रक्तदाब आणि स्थूलपणा (लठ्ठपणा)’ या विषयावर संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. प्रशांत याकुंडी (BAMS,MD), यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी व्यासपीठावर माधवबाग संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख श्री. अनंत नेरळकर, सेवानिवृत्त जेष्ठ लेखापरीक्षक तसेच अध्यक्ष सेवानिवृत्त कर्मचारी संघटना कन्नड श्री. कुंभकर्ण साहेब आणि वाचनालयाचे सचिव रामकृष्ण पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. याकुंडी यांनी बदलती जीवनशैली आणि रोग प्रतिकारक शक्ती, आहार, विहार आणि विचार, हृदयरोग, मधुमेह, वाढत्या वजनाचे दुष्परिणाम, नियमित व्यायामाची गरज आणि माधव बाग या संस्थेची हृदयरोग, मधुमेह यासारख्या आजारावरील आधुनिक आयुर्वेदिक उपचार पद्धती आदी विषयावर अगदी सोप्या भाषेत PowerPoint presentation च्या माध्यमातून मार्गदर्शन करून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच उपस्थित जेष्ठ नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.

Related projects