Last Updated: 09/11/2023By Categories:

दिवसातून फक्त दोन वेळा जेवल्याने वजन कमी करता येते आणि मधुमेह दूर ठेवता येतो. – ॲड. उल्हास सावजी.

दिवसातून दोन पेक्षा अधिक वेळा जेवल्याने प्रत्येक वेळी प्रमाणापेक्षा जास्त इन्सुलिन शरीरात तयार होते. त्यामुळे वाढते वजन, मधुमेहाचा धोका निर्माण होतो परंतु, दिवसातून फक्त दोन वेळा जेवल्याने वजन कमी होते आणि मधुमेहास दूर ठेवता येते तसेच मधुमेह झालेला असल्यास तो सुद्धा आटोक्यात आणता येतो. असे प्रतिपादन ॲड. उल्हास सावजी यांनी डॉ. जगन्नाथ दीक्षित द्वारा संचलित मधुमेह व स्थूलता मुक्त विश्व अभियानांतर्गत, सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय व बाळासाहेब पवार फाउंडेशन कन्नड आयोजित, शनिवार व्याख्यानमालेत पुष्प ३३ मध्ये बोलतांना केले.

विनासायास वेट लॉस आणि मधुमेह प्रतिबंध याविषयी शनिवार रोजी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की दोन वेळा जेवल्याने शरीरात इन्सुलिनची मात्रा प्रमाणात राहते. परंतु आपण जास्त वेळा खातो, त्यामुळे अतिरिक्त इन्सुलिन तयार होऊन शिल्लक राहिलेले ग्लुकोज चरबीच्या रूपात शरीरात साठवले जाते त्यामुळे वजन वाढते व मधुमेहाचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी रोज फक्त दोन वेळा जेवण ४५ मिनिटात ४.५ किलोमिटर चालणे आवश्यक आहे.

यावेळी व्यासपीठावर डॉ. यशवंत पवार व श्री कालिदास उपासनी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाळके यांनी केले आणि आभार डॉ. रुपेश मोरे यांनी मानले.

Related projects