Last Updated: 06/11/2023By Categories:

शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेतील यशात शिक्षकांची भूमिका महत्वाची – श्री गोकुळ सिनकर

श्री. जितेंद्र पाडवे यांनी विद्यार्थ्यासमोर उलगडले शालेय स्पर्धा परीक्षेतील यशाचे गुपित व अगणिक संधी

शालेय स्पर्धा परीक्षा अतिशय सोप्या असतात परंतु शिक्षक आणि खास करून पालक यांचे दुर्लक्ष विद्यार्थ्यासाठी नुकसानकारक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेतील यशात शिक्षकांची व पालकांची भूमिका महत्वाची महत्वाची आहे. असे प्रतिपादन, श्री गणेश सिनकर शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा शिक्षक, ज्ञानदीप विद्यालय, सिल्लोड यांनी केले.

सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड आणि बाळासाहेब पवार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक १५ जुलै २०२३ वेळ सकाळी १० वाजता आयोजित व्याख्यानमालेच्या पुष्प २८ वे निमित्त शालेय स्पर्धा परीक्षा : स्वरूप आणि अभ्यास तंत्र विषयावर ते बोलत होते. बोलतांना त्यांनी शालेय स्पर्धा परीक्षेत यशाची पंचसूत्री सांगितली. ते म्हणाले कि, स्वयंप्रेरणा , प्राधान्यक्रम, सकारात्मक विचार, स्वतःसाठी वेळ आणि स्वावलंबन हे यशाची पंचसूत्री आहे. तिचे पालन केल्यास शालेय स्पर्धा परीक्षात हमखास यश मिळेल.

सह मार्गदर्शक श्री जितेंद्र पाडवे यांनी शालेय विद्यार्थांना देता येतील अशा उदा. एमटीएस परीक्षा, एन टी एस परीक्षा, एम एम एस परीक्षा, पूर्व माध्यमिक, माध्यमिक स्कॉलरशिप ,नवोदय परीक्षा , होमी भाभा परीक्षा, इंडीयन कॉम्प्युटींग,गणित ओलंपियाड, एन डी ए आदि परीक्षासंबधित पॉवर पोईंट प्रझेंटेशन द्वारे सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासीठावर प्रा. रंगनाथ लहाने व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यामंदिर चे शिक्षक श्री. प्रकाश जीरेमाळी सर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सावित्री बाई फुले कन्या विद्यालय, साने गुरुजी माध्यमिक विद्यालय व संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यामंदिर चे इयत्ता पाचवी आणि आठवी चे विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाकळे यांनी केले. श्री. अरविंद पदमे यांनी आभार मानले

Related projects