Last Updated: 06/11/2023By Categories:

शालेय जीवनातच पालक व शिक्षकांनी विद्यार्थाच्या दैनंदिन सवयी आवडीनुसार करिअरचा कल ओळखावा. – डॉ. अनिल जाधव.

विद्यार्थ्याच्या शालेय वयातच त्याच्या दैनंदीन जीवनातील वर्तणूक , सवयी आणि क्षमता यावरून तो कोणत्या क्षेत्रात करिअर करू शकतो हे काही क्लुप्त्या वापरून समजू शकते. ते योग्य प्रकारे हेरून त्या प्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पालक आणि शिक्षकांची आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय करिअर सेवा , श्रम मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्लीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अनिल जाधव यांनी केले.

दि. २२ एप्रिल २०२३, शनिवार रोजी सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय आणि बाळासाहेब पवार फाऊंडेशन कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे सोळावे व्याख्यान पुष्प गुंफण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर वाचनालयाचे सचिव श्री रामकृष्ण पवार, मुख्याध्यापक डॉ. रुपेश मोरे , मुख्याध्यापक श्री संजय जाधव उपस्थित होते या वेळी बोलतांना त्यांनी शालेय जीवनात देता येणाऱ्या स्पर्धा परीक्षा, दहावी आणि बारावी नंतर करता येणाऱ्या असंख्य करिअर क्षेत्रांविषयी पॉवर पोईंट प्रेझेन्टेशन द्वारे माहिती दिली. या वेळी कन्नड शहरातील सुजाण पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालय अधीक्षक नितीन वाकळे यांनी केले तर आभार डॉ. रुपेश मोरे यांनी मानले.

Related projects