Last Updated: 24/11/2023By Categories:

धावपळीच्या जीवनात मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. डॉ. सुधीर पवार.(सहयोगी प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग संत तुकाराम महाविद्यालय, कन्नड) मानसिक आजारांची दैनंदिन लक्षणे ओळखता येणे गरजेचे

डॉ. महेंद्र पाटील (सहयोगी प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग संत तुकाराम महाविद्यालय,कन्नड) जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या करताना मानसिक आरोग्यास महत्वाचे स्थान दिले आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक ताण तणावांना सामोरे जावे लागते. अनेक लोक मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत त्यामुळे मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे प्रतिपादन डॉ. सुधीर पवार.(सहयोगी प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग संत तुकाराम महाविद्यालय, कन्नड) यांनी केले. जागतिक आरोग्य दिनानिमित्य सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय, कन्नड व बाळासाहेब पवार फाउंडेशन आणि मानसशास्त्र विभाग संत तुकाराम महाविद्यालय, कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ते बोलत होते.

याच कार्यक्रमात बोलताना दुसरे वक्ते डॉ. महेंद्र पाटील (सहयोगी प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग संत तुकाराम महाविद्यालय,कन्नड) यांनी विविध मानसिक आजार यांची लक्षणे व उपचार या विषयी उपस्तीतांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि, दैनंदिन आयुष्यात मानसिक आजारांची लक्षणे ओळखून वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

यावेळी व्यासपिठावर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा.श्रीमती रंजना देशमुख (सावित्रीबाई फुले माध्य. व उच्च माध्य. कन्या विद्यालय, कन्नड) होत्या. कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले माध्य. व उच्च माध्य. कन्या विद्यालयाचे सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन वाकळे यांनी केले तर आभार श्री. विसपुते सर यांनी केले.

Related projects