Last Updated: 06/11/2023By Categories:

शालेय जीवनात सुदृढ व तणावमुक्त राहण्यासाठी रोज एक तास मैदानावर खेळा – डॉ. उदय डोंगरे

शालेय जीवन हे एखाद्या आवडत्या खेळात प्रावीण्य मिळविण्यासाठी उत्तम काळ आहे. या काळात आपल्या आवडत्या खेळात सरावाने प्रावीण्य मिळवता येते. रोज एक तास आपल्या आवडीचा खेळ मैदानात खेळल्याने जीवन तणावमुक्त व शरीर सुदृढ राहते. असे प्रतिपादन तलवार बाजीचे प्रसिद्ध खेळाडू व प्रशिक्षक डॉ. उदय डोंगरे यांनी केले.
सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड आणि बाळासाहेब पवार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शुक्रवार दि. २१ जुलै २०२३ रोजी व्याख्यानमालेच्या पुष्प २९ निमित्त ते बोलत होते. ते कन्नड शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहे. बोलतांना त्यांनी विविध खेळ प्रकार व त्यातील विविध संधी व शासनाच्या विविध योजना या बाबींवर भाष्य केले. शालेय विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन , प्रशिक्षण मिळाले तर क्रीडा क्षेत्रात करियर घडविण्याच्या अनेक संधी विद्यार्थ्याना आहे.

शिवाजी महाविद्यालयाचा शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग हा आपल्या जिल्ह्यातील सर्वाधिक साधन सुविधांनी सुसज्ज आहे. ह्या सुविधांचा सुद्धा लाभ कन्नड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी व्यासीठावर सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे शिक्षक श्री. अजित खंबाट उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्री बाई फुले कन्या विद्यालयाचे कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय जाधव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाकळे यांनी केले.

Related projects