Last Updated: 10/11/2023By Categories:

महात्मा गांधी सार्वकालिक होते,आहे आणि राहणार- श्री. द्वारकानाथ जोशी.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजीचे विचार, तत्त्वज्ञान पूर्वीही तितकेच प्रभावी होते आणि या पुढेही राहणार ते महात्मा गांधी सार्वकालिक होते, आहेत आणि असणार असे प्रतिपादन, महात्मा गांधी विचारधारा पुरस्कर्ते, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, उत्कृष्ट वक्ते, परीक्षक, मराठी भाषा अध्यापन तज्ज्ञ, संपादक श्री. द्वारकानाथ जोशी यांनी केले. महात्मा गांधीजीच्या जयंती निमित्य कन्नड शहरातील सहकारमहर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय आणि बाळासाहेब पवार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यान मालेतील, ३८ वे पुष्प गुंफताना सार्वकालिक महात्मा गांधी” या विषयावर ते बोलत होते.

व्याख्यानात बोलताना पुढे ते म्हणाले कि, गांधीजी म्हंटले होते कि, माझे जीवन हाच त्यांचा संदेश आहे. खेड्याकडे चला हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्वाचा वाटतो. आधी केले मग सांगितले हे त्यांचे तत्व आजच्या युगात खूप महत्वाचे आहे. यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले माध्यमिक कन्या विद्यालयाचे शिक्षक अजित खंबाट यांची उपस्थिती होती. व्याख्यान ऐकण्यासाठी कन्नड शहरातील शाळांमधून शालेय विद्यार्थी उपस्थित होते. आभार वाचनालयाचे अधीक्षक नितीन वाकळे यांनी मानले.

Related projects