Last Updated: 04/11/2023By Categories:

सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय, कन्नड येथे Art of Living संस्थेच्या वतीने 6 दिवसाच्या Happiness Course चे आयोजन 26 जून ते 1 जुलै 2023 ( वेळ: सायं ६ ते ९ ) दरम्यान करण्यात आले होते. या कोर्स ची सांगता 1 जुलै 2023 रोजी झाली. या प्रसंगी कन्नड तहसील चे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री. मा. विद्याचरण कडवकर, डॉ. प्रवीण पवार, Happiness Course Teacher श्री. संजय भालेकर, श्री. संतोष सोळंके, सौ. सुनिता सोळंके आणि शिबिरात सहभागी साधक यांनी वाचनालयात सदिच्छा भेट दिली.

या वेळी वाचनालयाचे सचिव श्री. रामकृष्ण पवार यांनी वाचनालय, अभ्यासिका आणि वाचनालय आणि बाळासाहेब पवार फाऊंडेशनच्या उपक्रमाची भेटी दरम्यान माहिती दिली. तहसीलदार साहेब , तसेच संजय भालेकर, संतोष साळुंके यांनी वाचनालय आणि फाऊंडेशनच्या कामाचे कौतुक केले. संजय भालेकर यांनी Art of Living चे काही निवडक ग्रंथ साहित्य वाचनालयास भेट देण्याचे जाहीर केले. वाचनालयाच्या वतीने वाचनालयाचे सचिव श्री. रामकृष्ण पवार यांच्या हस्ते तहसीलदार साहेब आणि शिबिराचे शिक्षक यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार कण्यात आला.

Related projects