1. उद्घाटन कार्यक्रम-: कन्नड तालुक्यातून उत्तमोत्तम खेळाडू तयार व्हावेत.- प्राचार्य डॉ. विजय भोसले.
कन्नड : येथील सहकार महर्षी बाळासाहेब पवार फाऊंडेशन व सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कन्नड तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ( ता. ११ ) अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय भोसले होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अशोकराव आहेर, गटनेते संतोष काल्हे, मा. नगरसेवक संतोष निकम , रवी राठोड, प्रा. डॉ. शिवाजी हुसे, श्याम खोसरे, डॉ. उदय डोंगरे, संजय जाधव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. भोसले म्हणाले यशापयशाचे ओझे न बाळगता खिळाडू वृत्तीने क्रीडा प्रकारात सहभाग घ्या. अभ्यासा बरोबरच खेळात सहभाग घ्या.
कन्नड तालुक्यात क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी आपण प्रयत्न करू. कन्नड तालुक्यात क्रिडा संस्कृती रुजावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे ही प्राचार्य डॉ. भोसले म्हणाले. सर्व सहभागी स्पर्धकांचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.यावेळी संतोष कोल्हे म्हणाले की या तालुक्यात राज्यस्तरीय स्पर्धा व्हाव्यात . वाचनालया तर्फ सातत्याने चांगले उपक्रम होतात त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. उदय डोंगरे यांनी केले . या स्पर्धत कन्नड विविध शाळेतील तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी सहकार महर्षी बाळासाहेब पवार व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार श्री नितिन वाकळे यांनी मानले.
2. समारोप/ बक्षीस वितरण कार्यक्रम :- राजवर्धन राजपूत, महेक शेख, विश्वजीत राजपूत आणि रितू राठोड यांना सुवर्णपदकसहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयात बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
कन्नड : शहरातील बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय येथे (दि. ११) बुधवारी कन्नड तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पाच गटात झालेल्या या स्पर्धेत ३० शाळांमधील 282 खेळाडूंनी सहभाग घेतला. तत्पूर्वी सकाळी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात क्रीडा शिक्षक सुरेश तेजराव भुसारे मथुरा माता कन्या विद्यालय चिंचोली (लिं) आणि सुदाम नागोराव वाघ नागेश्वर विद्यालय नागापूर यांना वाचनालयाच्या वतीने गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सायंकाळी बक्षीस वितरण कार्यक्रमात गौताळा व्हॅली स्कूल कन्नडचे प्राचार्य डॉ. नायर हे अध्यक्षस्थानी होते, तर व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते (दोन्ही – खेळाडू व प्रशिक्षक) डॉ. उदय डोंगरे, तालुका क्रीडा संयोजक श्री श्याम खोसरे, गौताळा व्हॅली स्कूलचे उपप्राचार्य विश्वास आढाव आणि क्रीडा शिक्षक प्रतिनिधी राकेश निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. नायर यांनी स्पर्धा आयोजकांचे आणि सर्व सहभागी खेळाडूंचे विशेष कौतुक केले आणि खेळाडूंना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेतील प्रत्येक गटातील चार विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उपक्रम शिक्षक प्रवीण दाभाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर, नितीन वाकळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. उदय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक अजित खंबाट, करण राठोड, राहुल दणके आणि तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
विजेते विद्यार्थी इयत्ता पाचवी ते सातवी गट मुले १) राजवर्धन राजपूत २)संस्कार बारगळ ३)वैभव चव्हाण ४)समर्थ देशमुख
इयत्ता पाचवी ते सातवी गट मुली १)महेक शेख २)संस्कृती सोळुंके ३)रुचिता महालपुरे ४)जोया शेख
इयत्ता आठवी ते दहावी गट मुले १)विश्वजीत राजपूत २)अनुज सोनवणे ३)आदित्य राठोड ४)अथर्व कापुरे
इयत्ता आठवी ते दहावी गट मुली १)रितू राठोड २)गौरी वाघ ३) श्रेष्ठा चव्हाण ४)भाग्यश्री पवार
इयत्ता अकरावी ते इतर सर्व खुला गट १)आदित्य पवार २)सायली राठोड ३)हर्षल खारकर ४)राहुल दणके