Last Updated: 06/11/2023By Categories:

बाल वयापासून जबाबदारी दिल्याने मुलामुलींचे जीवन समृद्ध होते.- डॉ. सुनिता डोईबळे.

बाल वयापासूनच मुलांमुलींना दैनंदिन जीवनातील जबाबदारी दिल्याने मुलामुलींचे जीवन समृद्ध होते. जबादारीमुळे भविष्यातील आव्हाने पेलण्याचे बळ मुलामुलींना प्राप्त होते. असे प्रतिपादन डॉ. सुनिता डोईबळे यांनी केले.

दि. ६ मे २०२३ रोजी सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय आणि बाळासाहेब पवार फाऊंडेशन कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे अठरावे व्याख्यान पुष्प गुंफण्यात आले. आजच्या व्याख्यान पुष्पात संवाद सेतू प्रतिष्ठान,छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने ‘ आनंदी पालकत्व या विषयावर संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमासाठी
डॉ . सुनिता डोईबळे (BDS, Mumbai), आणि त्यांच्या सहकारी डॉ सुनंदा कुलकर्णी, यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात पालकत्व आनंदी कसे करता येईल, पालकांच्या जबाबदाऱ्या, मुलांचे भावविश्व, पालकांच्या अपेक्षा आदी विषयावर अगदी सोप्या भाषेत विशिष्ट अंतराने नाटिका सादर करून PowerPoint presentation च्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमांत शेवटी सहभागी झालेल्या निवडक पालकांनी आपले मनोगत व्यक्त केलं. डॉ. रुपेश मोरे यांनी प्रमुख मार्गदर्शक, वक्ते व सहभागी पालक यांचे आभार मानले. नितीन वाकळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Related projects