Last Updated: 06/11/2023By Categories:

पुस्तक प्रकाशन कार्यशाळेत सापडला पुस्तक निर्मितीचा राजमार्ग

पुस्तकाची संकल्पना, संहितालेखन, संपादन, मुद्रण, मार्केटिंग, प्रकाशन आदी विषयांची सूत्रबद्धपणे पुस्तक निर्मिती प्रक्रिया नवोदित लेखक,लेखिका, कवी, कवयित्री यांच्या समोर सकाळ प्रकाशन विभाग प्रमुख श्री. आशुतोष रामगिर यांनी मांडली. निमित्त होते सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय व बाळासाहेब पवार फाऊंडेशन आणि सकाळ प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यशाळेचे. शनिवार दिनांक १७ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजे दरम्यान ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत बोलतांना श्री रामगीर म्हणाले की, प्रत्येक पुस्तकाला वाचक आहे. फक्त ते वाचकाला हवं तेव्हा, हवे तिथं त्याला परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हायला हवं. पुस्तकाची बांधणी आकर्षक हवी, ग्राहकाने ते पाहता क्षणी उचलावे. ही सर्व सुविधा सकाळ प्रकाशन सुलभ पद्धतीने नाममात्र दरात करून देते. अगदी लेखकाला एकच प्रत प्रकाशित करायची असेल तरीही. पुस्तक निर्मिती करतांना काय काळजी घ्यायला हवी?, कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे? मार्केटिंग कसे करावे? आदी गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच पुस्तक प्रकाशन ते थेट विक्री, प्रिंट ऑन डिमांड या प्रगत तंत्रज्ञानाचा उपस्थितांना परिचय करून दिला.

या वेळी व्यासपीठावर, कन्नडचे प्रसिद्ध लेखक डॉ. रमेश सूर्यवंशी, प्रा. रंगनाथ लहाने, वाचनालयाचे सचिव श्री रामकृष्ण पवार हे होते. या ठिकाणी सकाळ प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालय अधीक्षक नितीन वाकळे यांनी केले तर आभार डॉ. रुपेश मोरे यांनी मानले.

Related projects