Last Updated: 06/11/2023By Categories:

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ तास सलग वाचन,अभ्यास उपक्रम

दि. १३ एप्रिल २०२३ रोजी सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय व बाळासाहेब पवार फाउंडेशन कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त “१४ तास सलग अभ्यास” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात एकूण १११( ६३ मुली आणि ५५ मुले ) शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत सलग १४ तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना दिली. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी १४ तास सलग अभ्यास उपक्रम संयोजन समितीचे अध्यक्ष व सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक/ प्राचार्य अरविंद कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक( छत्रपती संभाजी नगर) तथा ग्राम विकास अधिकारी पंचायत समिती कन्नड आर. ए. पगारे, वाचनालयाचे सचिव रामकृष्ण पवार, सावित्रीबाई फुले कन्या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जाधव आणि उपक्रम संयोजन समिती सदस्य शंकर कांबळे, अशोक वाहूळ, चंद्रमणी मनवर, डॉ. अंबादास सगट डॉ. नितीन सरवदे, प्रवीण दाभाडे प्रकाश जिरेमाळी, साईनाथ करवंदे,विनोद अंभोरे, विनोद कदम, आणि वाचनालय व अभ्यासिका अधीक्षक नितीन वाकळे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपक्रमाचे उद्घाटन झाले.

उपस्थितांनी सहभागी विद्यार्थ्यांना सलग १४ तास अभ्यासासाठी शुभेच्छा दिल्या.या उपक्रमात सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, महाराजा सयाजीराव गायकवाड माध्यमिक विद्यालय, साधना पाटील प्राथमिक विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, न्यू हायस्कूल कन्नड, कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय, कै. काशिनाथ पाटील जाधव प्राथमिक विद्यालय, श्री आजुबाई माध्यमिक विद्यालय, शिवाजी महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग आणि टेक्नॉलॉजी, कन्नड, संत तुकाराम महाविद्यालय इत्यादी शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. उपक्रमाच्या समारोपाच्या वेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना संयोजन समितीच्या वतीने पेनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातील १० आदर्श विद्यार्थ्यांना दि. १५ एप्रिल २०२३ रोजी आयोजित डॉ. प्रभाकर गायकवाड यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ प्रेम’ या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात बक्षीस व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात येतील. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समिती अध्यक्ष अरविंद कांबळे व सर्व समिती सदस्य , उपक्रमात सहभागी शाळा, महविद्यालयाचे सर्व मुख्यध्यापक, शिक्षक, उपक्रम परीक्षक म्हणून पूर्ण वेळ उपस्थित असलेले शिक्षक निलेश देशमुख,दारवंटे सर, पुरुषोत्तम बागुल, हरिश्चंद्र शेवरे, नारायण पुजरोड, अजित खंबाट, आबा पवार, पंकज शेजवळ तसेच वाचनालयाचे सहाय्यक कर्मचारी नरेश सोनवणे आणि वैभव शिरसे यांनी परिश्रम घेतले.

Related projects