Last Updated: 06/11/2023By Categories:

अभ्यासाचे योग्य नियोजन आणि सातत्यातूनच स्पर्धा परीक्षेत यशाचा मार्ग गवसतो.

– प्रा.सोपान दारवंटे

पदवी शिक्षणाच्या काळातील अभ्यास, वाचन हे स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देईल परंतु कुणाच्या सांगण्यावरून स्पर्धा परीक्षा विश्वात पाऊल ठेवू नका असा मोलाचा सल्ला प्रा.सोपान दारवंटे(संचालक, ज्ञानपीठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, छ. संभाजी नगर) यांनी दिला. सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय व बाळासाहेब पवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा विश्व समजून घेताना या विषयावर व्याख्यानमालेत ते बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना PSI, STI आणि राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करावी? या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करत आहात त्याचा पूर्ण अभ्यासक्रम हा तोंडपाठ असावा, किमान तीन दैनिकातील संपादकीय वाचून त्यावरील नोट्स तयार कराव्या.
फास्ट ट्रॅक मराठी व्याकरण व शब्द संग्रह या पुस्तकाचे लेखक प्रा. छत्रपती रन्हेर(संचालक छत्रपती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र संभाजीनगर) यांनी सरळ सेवा परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सरळ सेवा(पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक आदी) परीक्षेत यशाचा मंत्र सांगितला. तसेच गणित आणि मराठी विषयात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची प्रात्यक्षिकं करून दाखवली. यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तसेच भविष्यात तयारी करू इच्छिणारे विद्यार्थी उपस्थित होते. व्यासपीठावर वाचनालयाचे सचिव रामकृष्ण पवार, मुख्याध्यापक डॉ. रुपेश मोरे उपस्थित होते.सूत्र संचालन नितीन वाकळे यांनी केले.

Related projects